Meri Curie:The Alchemist
मेरी क्युरी विज्ञानातील किमयागार
७ नोव्हेंबर रोजी मेरी क्युरी यांची १५५ वी जयंती, बरोबर ८८ वर्षापूर्वी म्हणजेच ४ जुलै १९३४ ला मेरी क्युरी हे जग सोडून गेल्या, दोन वेळा विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या महिला म्हणून त्या एकमेवच, आपल्या वैयक्तिक जीवनात अनेक संघर्षाला, अपमानाला तोंड देऊन प्रत्येक ठिकाणी पहिलं असण्याचा मान मिळवणाऱ्या, निराशेला आशेची किनार देणाऱ्या, दोन मूलद्रव्यांचा शोध लावणाऱ्या, विज्ञाननिष्ठ वैज्ञानिक म्हणजे माझ्या दृष्टीने एक किमायगारच.
बालपण आणि शिक्षण
मेरी क्युरीच लहानपणीचे नाव मारिया स्क्लोडोव्हस्का. त्यांचे आई - वडील हे उच्चशिक्षित होते. वडिल गणित आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक तर आई मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती. लहान वयातच त्यांना वडिलांकडून विज्ञानाचे धडे मिळाले होते. त्यांनी आपले शिक्षण भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांत पूर्ण केले. तसेच त्यांनी भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून देखील काम केले होते.त्यांना पाच भावंड होती.
मेरी क्युरी यांचे अविष्कार
- मेरी क्युरी यांनी रेडीयम आणि पोलोनियम या किरणोत्सारी पदार्थांचा शोध लावला. त्यांनी पहिल्या महायुद्धातील जखमींच्या उपचारासाठी क्ष-किरण (X-Ray) गाडी आणि उपकरणे तयार केली. या किरणांमुळे रुग्णांची मोडलेली हाडे आणि त्यांना कुठे गोळ्या लागल्या आहेत हे बाहेरूनच बघू शकतो.
- मेरी क्युरी यांनी शोधलेल्या रेडियम चा उपयोग कर्करोगाचा उपचार करण्यासाठी करण्यात येतो. पोलोनिम या पदार्थाचा उपयोग अंतराळातील उपग्रहांमध्ये उष्णता स्त्रोत म्हणून देखील वापर होतो. तसेच याचा वापर स्थिर उर्जा नाहीशी करण्यासाठी, फोटोग्राफिक फिल्म वरील धूळकण साफ करण्यासाठी होतो.
नोबेल पारितोषिक
- सन १९०३ मध्ये त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. त्याच वर्षी मेरीला पेर आणि बेक्वरेल यांच्याबरोबर रेडिओऍक्टिव्हिटीसाठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं. नोबेल समितीने पेर आणि बेक्वरेल या दोघांचीच नाव पुढं केली पण मग पेरने ह्यांनी नोबेल समितीला समजावून सांगितल की हे मूळ काम मेरीचच आहे.
- १९११ ला पुन्हा त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले ते त्यांच्या रसायनशास्त्राच्या कामासाठी. रेडियम, रेडियमची कंपाऊंड आणि रेडियमच धातूसदृश रूप शोधल्याबद्दल.
मृत्यु
मेरी रेडिओऍक्टिव्हिटी वर काम करत होत्या त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम कोणालाच माहीत नव्हते. मेरी तर त्या मूलद्रव्यांच्या टेस्ट ट्यूब खिशात घेऊन फिरत, रात्री झोपताना बाजूला कपाटाच्या ड्रावर मध्येही ठेवत. मेरीला रेडिओऍक्टिव्हिटीच्या अतिवापरामुळे ल्युकेमिया कॅन्सर झाला. ४ जुलै १९३४ रोजी त्या मरण पावल्या. मेरी आणि पेरने लिहून ठेवलेल्या नोंदवहीवर सुद्धा रेडिओऍक्टिव्हिटीचा परिणाम झाला म्हणूनच ती वही लेड (Lead) बॉक्स मध्ये जतन करून ठेवलीय.
मेरी क्युरी यांचे विचार
- चांगले जग निर्माण करायचे असेल तर स्वतः पासून सुरुवात करा.
- असे काही वैज्ञानिक असतात जे सत्य स्थापित करण्याऐवजी चुका शोधण्याची घाई करतात
- मला वाटते, प्रगती हि लवकर आणि सहजा सहजी घडून येत नाही
- लोकांबद्दल नाही तर कल्पनांबद्दल उत्सुक रहा.
- परिपूर्णतेची भीती बाळगू नका, आपण त्या पर्यंत कधीही पोहचू शकत नाही.
- कोणीही काय पूर्ण झाले ते बघत नसते, काय अपूर्ण आहे या कडेच सर्वांचे लक्ष असते.

Comments
Post a Comment